Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

अखेर निर्भयाला न्याय मिळाला; चारही बलात्काऱ्यांना फासावर लटकवले

अखेर निर्भयाला न्याय मिळाला; चारही बलात्काऱ्यांना फासावर लटकवले

निर्भया बलात्कार प्रकरणी अखेर आज (दि. २० मार्च) रोजी पहाटे साडे पाच वाजता तिहारच्या जेल क्र. ३ मध्ये चारही दोषींना फाशी देण्यात आली. यानंतर ३० मिनिटांनी डॉक्टरांनी चौघे मृत झाल्याची घोषणा केली. मुकेश सिंह, अक्षय ठाकूर, विनय शर्मा व पवन गुप्ता या चार आरोपींनी ७ वर्ष ३ महिने आणि ३ दिवसांपूर्वी निर्भयावर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला होता. ज्यात पुढे तिचा मृत्यूही झाला. या फाशीवर प्रतिक्रिया देताना निर्भयाची आई म्हणाली की आजचा दिवस देशाच्या मुलींच्या नावे समर्पित आहे. मी न्यायव्यवस्थेचे व सरकारचे आभार मानते. आज आम्ही आनंदोत्सव साजरा करणार नाही पण या शिक्षेमुळे इतर गुन्हेगारांत भिती निर्माण होईल.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *