मोदी ला भारतात आणायचा मार्ग मोकळा
हिरे व्यापारी नीरव मोदी याने भारत प्रत्यार्पणाविरूद्ध केलेले अपील इंग्लंड हायकोर्टाने नाकारले असून, पुढचे अपील करण्यासाठी पाच दिवसांची मुदत दिली आहे. पंजाब नॅशनल बँक घोटाळा आणि पैशाच्या अफरातफरी प्रकरणात दोषी आढळल्यामुळे फेब्रुवारी महिन्यात वेस्टमिन्स्टर कोर्टाने नीरव मोदीचे प्रत्यार्पण करण्याचे मान्य केले होते.
तसेच भारतात या प्रकरणाची योग्य सुनावणी होणार नाही हा निरव मोदीचा दावाही फेटाळून लावला होता. त्या नंतर ब्रिटनच्या गृहसचिव प्रिती पटेल यांनी एप्रिलमध्ये प्रत्यार्पणास मान्यता दिली होती.
Source – AIR
