नीरव मोदीच्या हस्तांतरणाला इंग्लंडच्या गृहमंत्रालयाची मान्यता
इंग्लंड/नवी दिल्ली: आर्थिक गुन्हेगार नीरव मोदीच्या हस्तांतरणाला इंग्लंडच्या गृहमंत्रालयाने मान्यता दिली आहे. सीबीआयनं या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
UK मधल्या न्यायालयानं नीरव मोदीच्या हस्तांतरणाची भारताची मागणी योग्य असल्याचा निर्वाळा फेब्रुवारीतच दिला होता.
