…..म्हणून निर्मला सीतारामन यांना आपलं भाषण मध्येच थांबवावं लागलं
नवी दिल्ली: आज जवळपास रेकॉर्ड ब्रेक २ तास ४१ मिनिटं चाललेलं अर्थसंकल्पीय भाषण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना थोडक्यात शेवटी सोडावं लागलं. त्याला कारणही तसंच होतं. आपल्या भाषणादरम्यान अर्थमंत्र्यांनी कविता, पुरातन दाखले यांचा मिलाफ केला होता. पण भाषण जसजसे लांबत गेले तसे खासदार, मंत्री व विशेष म्हणजे प्रधानमंत्री यांनाही शेवटी शेवटी कंटाळा यायला लागल्याचे दिसुन आले. अखेर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना मध्येच भाषण थांबवण्याचा इशारा केला. याउपर त्यांनी काहीपाने शिल्लक असल्याचे सांगितले पण पुनः एकवार राजनाथ सिंहांच्या विनंतीमुळे सिथारामन यांना आपलं भाषण आवरतं घ्यावं लागलं.
