नालासोपार्यात अवैधरित्या राहणाऱ्या नायजेरियन लोकांना अटक; १०९ बियरच्या बाटल्या जप्त!
नालासोपारा: पालघर जिल्ह्यातल्या नालासोपारा येथे अवैधरित्या राहणाऱ्या १८ नायजेरियन लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्या विरुद्ध तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात तीन महिलांसह १५ पुरुषांचा समावेश आहे. नालासोपारा पूर्वेकडील प्रगतीनगर मध्ये काही नायजेरियन नागरिक अवैधरित्या राहत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानंतर या भागांत कोंबिंग ऑपरेशन करून या १८ नायजेरियंना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून १०९ बियरच्या बाटल्या, फोन आदी सामान जप्त केले आहे.
Source – AIR
