Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी येत्या ८ फेब्रुवारीला मतदान , मतमोजणी ११ फेब्रुवारीला

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी येत्या ८ फेब्रुवारीला मतदान , मतमोजणी ११ फेब्रुवारीला

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी येत्या ८ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. नवी दिल्लीचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी काल या निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला. यासंबंधीची आधिसूचना १४  जानेवारीला काढली जाईल.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २१ जानेवारी आहे. मतमोजणी ११ फेब्रुवारीला होणार आहे. कालपासूनच निवडणूकीची आचारसंहिता लागू झाली आहे. विद्यमान दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ २२ फेब्रुवारीला संपत आहे.

२००५ साली झालेल्या निवडणुकीत ‘आप’नं ५४ पूर्णांक ३४ शतांश टक्के मतं मिळवून ६७ जागा जिंकल्या होत्या, तर भाजपला ३२ पूर्णांक १९ शतांश टक्के मतांसह केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला ९ पूर्णांक ६५ शतांश टक्के मतं मिळाली असली तरी, एकही जागा मिळाली नव्हती.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *