देशात वैद्यकीय प्रवेशासाठीच्या ‘नीट’ परीक्षेचं आयोजन
मुंबई/नवी दिल्ली, दि. ७: पदवीपुर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा- NEET (UG) 2023 आज देशाच्या विविध शहरांमधील विविध केंद्रांवर तसचं विदेशातील 14 शहरांमध्ये दुपारी 2 ते 5:20 या भारतीय वेळेनुसार घेतली जाईल ज्या वैद्यकीय इच्छुकांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे ते अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने नॅशनल एन्ट्रन्स कम एलिजिबिलिटी टेस्ट- NEET (UG)-2023 ही परीक्षा पुढे ढकलली आहे.
मणिपूर राज्यातील सध्याची कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बघता, ज्यांना मणिपूर हे परिक्षा केंद्र मिळालं आहे अशा विद्यार्थ्यांची परीक्षा मणिपूर सरकारच्या विनंतीवरून पुढे ढकलण्यात आली आहे. एनटीएने एका निवेदनात म्हटलं आहे की, या उमेदवारांच्या परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. उमेदवार NEET (UG) शी संबंधित कोणत्याही माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 011- 40759000 किंवा neet@nta.ac.in वर ईमेल करू शकतात. उमेदवारांना नवीनतम अद्यतनांसाठी NTA च्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.
