डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड; भाजपचा सभात्याग
मुंबई, दि.८: विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी अखेर शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली. भाजपचा या निवडणुकीला आक्षेप होता याबाबत त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या संदर्भात विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सभापती रामराजे निंबाळकर यांचे या विषयी लक्ष वेधण्याचा असफल प्रयत्न केला पण अखेर भाजप च्या सदस्यांनी सभात्याग केला.
या निवडीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले. डॉ. नीलम गोऱ्हे या शिवसेना नेत्या असून गेली अनेक वर्षे त्या विधानपरिषदेच्या सदस्या म्हणून निवडून जात आहेत.
