Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

शरद पवार गटाला आठवडाभरात पक्ष चिन्ह देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश

शरद पवार गटाला आठवडाभरात पक्ष चिन्ह देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश

नवी दिल्ली/मुंबई, दि. १९: पक्ष चिन्हासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्ज करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाला आज दिले. या अर्जानंतर आठवडाभरात निवडणूक आयोगानं त्यांना पक्ष चिन्ह द्यावं, असंही सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याची माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली. शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षांना त्यांचं त्यांचं पक्ष नाव वापरण्याची मुभा न्यायालयानं दिली. शरद पवार यांच्या पक्षाला कुठलंही पक्ष चिन्ह द्यायला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं न्यायालयात विरोध केला होता. आजच्या निकालामुळे गटाला पवार गटाला धक्का बसल्याचे मानले जाते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *