मोदींचा अंध भक्त कसा ओळखाल? – राष्ट्रवादीची भाजप कार्यकर्त्यांवर खोचक टीका
लोकसभा निवडणुकांची रणधुमाळीत आरोप प्रत्यारोपांचे खेळ चांगलेच रंगात येत आहेत. व्यंगचित्राच्या माध्यमातून राष्ट्रवादीने भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विटरवर ट्विट पोस्ट करत मोदींचे अंध भक्त कसे ओळखाल याचे उत्तर दिले आहे. तोची भक्त जाणावा… असा मथळा देऊन एक कार्टून काढण्यात आलं आहे. अंध भक्त ओळखण्याच्या सोप्या पद्धती या नावाने राष्ट्रवादीने हे व्यंगचित्र सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे.
राष्ट्रवादीचे व्यंगचित्र:
भक्त कसा ओळखावा? असा मथळा देत, एका कोपऱ्यात भक्त असं डोक्यावर लिहिलेले कार्टून दाखवण्यात आले आहे. या भक्ताने परिधान केलेल्या कुर्त्यावर मोदी हे नाव बऱ्याच वेळा लिहण्यात आले आहे. त्याच बाजूला भक्त कसा ओळखावा असा प्रश्न करून त्याचे उत्तर देखील लिहण्यात आले आहे.
भक्त ओळखण्याची पाच लक्षणं १) अपमानकारक आणि आक्षेपार्ह भाषा, २) कोणत्याच मुद्द्यांचा अभ्यास नाही ३) सोशल मीडियावर फेक फॉरवर्ड्स ४) खालच्या स्तरावरची टीका ५) राष्ट्रभक्तीचा दिखाऊपणा
ही महत्वाची लक्षण मोदींच्या अंधभक्तांमध्ये आहेत असं ट्विट राष्ट्रवादीने केलं आहे.
तोची भक्त जाणावा…
अंध 'भक्त' ओळखण्याच्या काही सोप्या पद्धती! #Bhakt @BJP4Maharashtra @BJP4India @CMOMaharashtra @PMOIndia pic.twitter.com/4gtEQTlRh9— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) March 29, 2019
