Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नवी मुंबईतील ‘आयसीएल'(ICL) शाळेला मराठी माध्यम चालवण्यात ‘रस’ उरलाय का?

शाळेच्या एका बोर्डमुळे पालकांच्या तोंडचं पाणीच पळालं

नवी मुंबई, दि.२८: नवी मुंबईतील वाशी स्थित इंडियन कल्चरल लीग (ICL) संचालित शाळेचा भोंगळ कारभार समोर आला आहे. वाशी सेक्टर १५/१६ येथील या शाळेबाहेर आज सकाळी एक बोर्ड लावण्यात आला होता, ज्यावर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षात प्राथमिक मराठी माध्यमाच्या प्रवेश प्रक्रिया कोविड च्या प्रादुर्भावामुळे सुरू नसल्याचे नमूद करण्यात आले होते. हा बोर्ड वाचल्यावर पहिलीच्या वर्गातील प्रवेशासाठी आलेल्या जवळपास ५० च्या वर पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले.

अधिक माहिती घेतल्यावर त्यांच्या असे लक्षात आले की इंग्रजी माध्यमांचे नवीन प्रवेश चालू आहेत मग मराठी माध्यमाबाबत दुजाभाव का? याची खातरजमा करण्यासाठी पालकांनी शाळा व्यवस्थापन विशेषतः शाळेच्या मुख्याध्यापिकांशी भेटण्याचा प्रयत्न केला. परंतू पालकांना भेट नाकारण्यात आली. यामुळे त्यांच्या चिंतेत आणखी भर पडली. जून महिना जवळपास संपत आलाय आणि अद्याप आपल्या पाल्यांचे प्रवेश झालेले नाहीत, शाळा मराठी माध्यम बंद करण्याच्या विचारात तर नाही ना? आता पुढे प्रवेश होणार की नाही एक ना दोन अशा अनेक शंका उपस्थित पालकांच्या मनात घोळायला लागल्या.

अखेर पालकांच्या शिष्टमंडळाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी स्वाती तिराडकर यांच्याकडे धाव घेतली. यावेळी उपस्थित पालक प्रतिनिधींनी घडला प्रकार त्यांच्यासमोर मांडला. यानंतर तिराडकर यांनी आयसीएल शाळेच्या मुख्याध्यापिकांना समक्ष भेटण्यास बोलावले तसेच येत्या दोन-तीन दिवसांत प्रवेश प्रक्रिया सुरू होतील यासाठी आपण जातीने लक्ष घालणार असल्याचे वचन दिले.

लिंक क्लीक करा आणि आम्हाला न चुकता YOUTUBE Channel || Facebook || Twitter ला SUBSCRIBE | LIKE | FOLLOW करा

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *