राज्यातील राष्ट्रीयीकृत बँका सकाळी १० ते २ या वेळेत सुरू राहणार
मुंबई: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँका ३० एप्रिल पर्यन्त सकाळी १० ते २ या वेळेत, खातेदारांसाठी सुरू राहतील, तर बँकांचे अंतर्गत कामकाज ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
राज्यातील सर्व बँकांची संघटना असलेल्या, राज्यस्तरीय बँकर्स समिती अर्थात एस एल बी सी ने हा निर्णय घेतला आहे.
