Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नाशिक येथे आज सायंकाळपासून कडक लॉकडाऊन सुरु

नाशिक येथे आज सायंकाळपासून कडक लॉकडाऊन सुरु

नाशिक, दि.१२: वाढत्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. आज दुपारपासून हा विशेष लॉकडाऊन जाहीर झाला असून २३ मे पर्यंत तो लागू असेल. या दरम्यान औषधांची दुकाने वगळता बाकी सर्व प्रकारची आस्थापने बंद ठेवली जाणार आहेत.

किंबहुना वाण-सामान व खाद्य-पदार्थांची दुकानंही या काळात बंद राहतील. या काळात नाशिककरांची गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय ३ दिवसांपूर्वी आगाऊ जाहीर करण्यात आला. मागील दोन दिवसांत नागरिकांनी पुढील दहा दिवसांचे साहित्य विकत घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पण अशी गर्दी झाल्यामुळे उलट कोविड चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय पुढील १० दिवसांत उपहारगृह बंद राहणार असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक व कारखान्यांत काम करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *