नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा, मुंबईत आझाद मैदानात धडकणार
नाशिक: शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा, मुंबईत आझाद मैदानात दाखल होत आहे. राज्यातल्या २१ जिल्ह्यातले ३० हजार शेतकरी या मोर्चात सहभागी होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी या मोर्चाला पाठिंबा दिला असून, ते यात सहभागी होणार असल्याचं, शेतकरी नेते अजित नवले यांनी सांगितलं. या मोर्चेकऱ्यांचं शिष्टमंडळ आज राजभवनावर जाऊन, राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची भेट घेणार आहे.
दरम्यान, या ट्रॅक्टर मोर्चाचा भाग म्हणून जिल्हा, तालुका तसंच गाव पातळीवरही ट्रॅक्टर फेरी काढण्याचा प्रयत्न संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं होत आहे. औरंगाबाद येथे उद्या दुपारी एक वाजता दिल्ली दरवाजापासून, किल्ले अर्क, सिटी चौक मार्गे भडकल दरवाजापर्यंत ट्रॅक्टर फेरी काढणार असल्याचं संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.
Source – AIR
