Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात अखेर कायमस्वरूपी ऑक्सिजन टाक्या बसवण्याचे काम पूर्ण

नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात अखेर कायमस्वरूपी ऑक्सिजन टाक्या बसवण्याचे काम पूर्ण

नाशिक, दि. २६: नाशिक शहरातल्या महापालिकेच्या डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयात गेल्या बुधवारी ऑक्सिजन टाकीची गळती होऊन २४ जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या ३१ मार्चला नव्याने बसवण्यात आलेल्या या टाकीची गळती सुरू झाल्याने महापालिकेनं बुधवारीच तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी केली असली, तरी आता या ठिकाणी या टाकीची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यासाठी आज पर्यायी व्यवस्था म्हणून एक किलो लिटरच्या दोन टाक्या बसवण्यात आल्या.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये दहा कोटी रुपये खर्च करून कायमस्वरूपी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात नऊ रुग्णालयांमधल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून, यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १० कोटी ८८ लाख रुपयांच्या या अत्यावश्यक प्रकल्पासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
Source – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *