अंनिस च्या डॉ. नरेंद्र दाभोळकर खून प्रकरणातला आरोपी विक्रम भावेला जामीन मंजूर
मुंबई/पुणे, दि.६: डॉ. नरेंद्र दाभोळकर(Narendra Dabholkar) खून प्रकरणातला आरोपी विक्रम भावे(Vikram Bhave) याला मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. तो सनातन संस्थेचा सदस्य असून या प्रकरणी सध्या तो येरवडा कारागृहात आहे. १ लाख रुपयाच्या हमीपत्रावर त्याला सोडलं जाईल. सुटकेनंतर त्यानं पुण्यातल्या एनआयए न्यायालयाच्या कार्यक्षेत्राबाहेर जाऊ नये असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनिष पुतळे यांच्या खंडपीठानं दिले आहेत.
दाभोळकर खून प्रकरणातल्या पुराव्यांशी छेडछाड करण्याचा, तसंच दाभोळकर यांच्या खुनाची आणि नंतर पळून जाण्याची रेकी करुन दोन मुख्य आरोपींना मदत केल्याचा आरोप भावेवर आहे.
Source – AIR
