वातावरण आम्हाला पोषक आहे, आम्हाला ८० टक्के मतदान पडेल
कणकवली: ज्या जिल्हयातील लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे त्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे बडे नेते भाजप खासदार नारायण राणे यांनी आजच्या मतदानाबाबत व त्यानंतर लागणाऱ्या निकालाबाबत एक भाकीत केले आहे. मतदानानंतर पत्रकारांशी संवाद साधताना नारायण राणे म्हणाले की, “मतदान करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. यावर्षी भाजपातर्फे नितेश राणे निवडणुकीला उभा आहे. या निवडणुकीत त्याच्या मतदारसंघात कणकवली, देवगड आणि वैभववाडी या तिन्ही ठिकाणी वातावरण आम्हाला, नितेश राणेसाठी पोषक आहे. आम्हाला ८० टक्के मतदान पडेल. त्यामुळेच ही निवडणूक एकतर्फी होईल असा विश्वास वाटतो”.
एकूणच आज वाढत राहिलेल्या मतदानाच्या टक्केवारीवर राणे समाधानी असल्याचे जाणवले.
