Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

सामूहिक नमाज प्रकरणी परभणी पोलिसांवर कारवाई; तर आ. बाबजानी दुर्राणी व इतर १२५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सामूहिक नमाज प्रकरणी परभणी पोलिसांवर कारवाई; तर आ. बाबजानी दुर्राणी व इतर १२५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

परभणी जिल्ह्याच्या पाथरी पोलिस ठाण्यातल्या सहायक पोलीस निरीक्षकासह पाच कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्या बदल्या केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन चालू असून या काळात सार्वजनिक ठिकाणी जमण्यास बंदी असून मंदिरं, मस्जिद, चर्च ही देवालंयही भाविकांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. पण काल परवा ईदच्या दिवशी सामूहिक नमाज केल्याप्रकरणी परभणी पोलिसांवर कडक कारवाई करण्यात आली आहे.

पाथरी शहरात जमावबंदी तसंच संचारबंदीचा आदेश असतानाही सामूहिक नमाजसाठी जमा होणाऱ्या नागरिकांना मज्जाव न केल्याबद्दल तसंच वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची कल्पना न दिल्याबद्दल ही कारवाई केली आहे.

या सामूहिक नमाज पठण प्रकरणी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह १२५ जणांविरूध्द पाथरी पोलीस ठाण्यात काल गुन्हा दाखल झाला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *