नागझिरा अभयारण्याचा पर्यटन विकासासाठी खासदार सुनील मेंढे यांची अभयारण्य अधिकाऱ्यांसोबत बैठक
भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये प्रस्तावित पर्यटन सर्किट मधील अत्यंत महत्त्वाचा भाग असणाऱ्या नागझिरा अभयारण्याचा पर्यटन विकासाच्या दृष्टीने विस्तृत आढावा घेण्यासाठी खासदार सुनील मेंढे ह्यांनी नागझिरा अभयारण्यात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
नागझिरा अभियारण्यात पर्यटन वाढ तसेच त्याच्या प्रसिद्धी साठी ह्या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. तसेच अभयारण्यात असणाऱ्या तलावांची दुरुस्ती, खोलीकरण ई विषयी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश मेंढे ह्यांनी दिले.
(सौजन्य – AIR)
