Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे १५ नोव्हेंबर रोजी जनसुनावणी

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे १५ नोव्हेंबर रोजी जनसुनावणी

मुंबई, दि. १३:  महाराष्ट्र  राज्य मागासवर्ग  आयोगाकडे प्राप्त झालेल्या  निवेदनांच्या  अनुषंगाने  नागपूर जिल्हाधिकारी  कार्यालय येथे  आयोगाने  १५ नोव्हेंबर २०२२ रोजी जनसुनावणी  आयोजित केलेली आहे.  ही जनसुनावणी  दुपारी १२.३० वाजता सुरू होईल.  सुनावणीस  उपस्थित  राहणाऱ्या  जाती  समूहाचे नाव  पुढीलप्रमाणे  आहेत. १. चुनेवाले, चुनेवाला, चुनगर २. कुंजडा ३. ठेलारी ४. भोयर ५. धोबी, परीट, वरठी, तेलगु महलवार(परीट) ६. लिंगायत आंबी ७) अहिर यांनी नियोजित वेळेत उपस्थित रहावे. असे आवाहन महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग पुण्याचे  सदस्य सचिव नरेंद्र आहेर यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *