Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नागरिकांनी व्यक्तिगत पातळीवर नियमितरित्या योगाभ्यासाला आपल्या जीवनशैलीचा भाग बनवावा – नितिन गडकरी

नागरिकांनी व्यक्तिगत पातळीवर नियमितरित्या योगाभ्यासाला आपल्या जीवनशैलीचा भाग बनवावा – नितिन गडकरी

नागपूर, दि. २१: आज विविध उपचार पद्धती सशुल्क उपलब्ध असतांना योगाभ्यास मात्र विनामूल्य आहे. विदेशात योग प्रशिक्षकांना भरमसाठ शुल्क द्यावे लागते तर भारतात अनेक योगाभ्यासी मंडळ योगसेवा निस्पृःह वृत्तीने करत आहेत. पंतप्रधानांनी राष्ट्रप्रमुखापासून तर सरपंचापर्यंत पत्र लिहून त्यांना योगदिवस साजरा करण्याचा आग्रह केला आहे. त्यामूळे सर्व नागरिकांनी व्यक्तिगत पातळीवर नियमितरित्या योगाभ्यासाला आपल्या जीवनशैलीचा भाग बनवावा असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी केले. नागपूरच्या कस्तुरचंद पार्कवर योग दिनाप्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झाले यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करतांना ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे सदस्य आलोक, प्रादेशिक अधिकारी राजीव अग्रवाल, राज्यसभा खासदार डॉ. विकास महात्मे,जनार्धन स्वामी योगाभ्यास मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ खांडवे प्रामुख्याने उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाप्रसंगी योग दिन देशातील ७५ ठिकाणी साजरा करण्यात आला, त्यात नागपूरच्या कस्तुरचंद पार्कचाही समावेश होता.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ तसेच नागपूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमस्थळी  पंतप्रधानांनी यावेळी मैसुरु येथून केलेल्या संबोधनाचेही थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले .

यावेळी जनार्दन योगाभ्यासी मंडळातर्फे प्रशिक्षकांनी सांगितलेली ताडासन, कटिचक्रासन, सूर्यनमस्कार यासह इतर योगासनाचे प्रात्यक्षिक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, कर्मचारी तसेच उपस्थित हजारो नागरिकांनी केली .

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *