महाराष्ट्राच्या वाट्याला ५०९० कुप्या
विविध राज्यांमध्ये म्युकरमायकोसिसच्या वाढत्या रुग्णसंख्येचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर अॅम्फोटेरिसिन बी औषधाच्या एकूण २३,६८० अतिरिक्त कुप्या आज सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना वितरित करण्यात आल्या आहेत असे केंद्रीय रसायन व खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी जाहीर केले आहे. यात महाराष्ट्राच्या वाट्याला ५०९० हजार कुप्या आल्या आहेत.
देशभरातल्या अंदाजे 8848 रूग्णांच्या संख्येच्या आधारे वाटप करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

