“अजूनपर्यंत मुस्लिम आरक्षण संदर्भात कोणताही मुद्दा सरकारसमोर आलेला नाही” : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई: आज झालेल्या पत्रकार परिषदे दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम आरक्षणाबाबत आपली भूमिका आज स्पष्ट केली. ते म्हणाले की, “अजूनपर्यंत मुस्लिम आरक्षण संदर्भात कोणताही मुद्दा सरकारसमोर आलेला नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जो मुद्दा आमच्यासमोर आलेला नाही आहे त्याच्यावर कोणी आदळआपट करण्याची गरज नाही आहे.”
