दुरुस्ती कामांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत १७ ते २१ मे दरम्यान १० टक्के पाणीकपात
मुंबई: मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे बंधाऱ्यावरच्या न्युमॅटिक झडपांच्या दुरुस्तीचे काम १७ ते २१ मे पर्यंत हाती घेतलं जाणार आहे. त्यामुळे या काळात मुंबईच्या पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणीकपात केली जाणार आहे. मुंबईकर नागरिकांनी या पाणीकपात कालावधीत पाण्याचा यथायोग्य साठा करावा आणि पाणी जपून वापरावं, तसच पालिका प्रशासनाला सहकार्य करावं, असे आवाहन पालिकेने केलं आहे.
