मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांना परिवहन मंत्र्यांची पावसाळी भेट
मुंबई: मुंबई-पुणे मार्गावरून शिवनेरीवर अश्वमेध ह्या राज्य महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खूश खबर आहे. या दोन्ही बसच्या दरात अनुक्रमे ८० ते १२० रुपयांची कपात करण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज केली. आठ जुलै म्हणाजेच येत्या सोमवारपासून नवे तिकीट दर लागू करण्यात येणार आहेत.
सध्या दरमहा दीड लाख प्रवाशांना उत्तम सेवा दिली जात आहे. या प्रतिष्ठित बस सेवेची लोकप्रियता ध्यानात घेऊन तिला सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त प्रवासी संख्या वाढवणे हा, तिकीट दर कमी करण्यामागचा उद्देश असल्याचे रावते यावेळी म्हणाले.
गेल्या काही काळात मुंबई-पुणे शिवनेरी व अश्वमेध या एसटी महामंडळाच्या बस सेवेला ओला उबेर यांनी आवाहन दिलं होतं. त्यातही यांच्यामार्फत शेअर करत प्रवास केला तर बऱ्याच अंशी तुलनेने स्वस्त प्रवास करता येत होता. आता एसटीने दर कपात केल्यामुळे प्रवासी संख्या वाढते का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
