Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ८८५०३०३४६३ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

मुंबई आणि पुण्यात ओमायक्रॉनच्या समूह संसर्गाला सुरुवात?

वाचा राज्याच आरोग्य सर्वेक्षण अधिकारी नेमके काय म्हणाले

मुंबई/पुणे: मुंबई आणि पुण्यात ओमायक्रॉनच्या समूह संसर्गाला सुरुवात झाल्याचा दावा, आयसरच्या हवाल्यानं राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी केला आहे. या दोन्ही महानगरातील वाढत्या ओमिक्रॉन प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील आयसर या संस्थेनं ओमिक्रॉन संसर्गाचं सर्वेक्षण केलं आहे.

त्यात बाधा झालेल्या ३८ रुग्णांनी कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नव्हता. यामध्ये लक्षणं नसलेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. लक्षणं कमी, रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाणही कमी; तसंच मृत्यूचं प्रमाणही कमी असलं तरी हा संसर्ग वाढू नये यासाठी आपण सर्वांनी नियम पाळणं गरजेचं आहे; असं आवटे यांनी म्हटलं आहे.

Source-AIR

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *