बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे अधिकाऱ्यांना निर्देश
मुंबई, दि.२: मुंबईत दरड कोसळण्याची शक्यता वाटत असलेल्या परिसरांमध्ये अधिक प्रभावीपणे प्रतिबंधक उपाययोजना राबवाव्यात असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिकेने संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
पालिकेची ‘मिड मान्सून’ आढावा बैठक नुकतीच झाली. या बैठकीत, मुंबई उपनगर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष आणि पूर्व उपनगराच्या अतिरिक्त महानगरपालिका आश्विनी भिडे यांनी हे निर्देश दिले गेले.
चालू पावसाळ्याच्या उर्वरित काळात पालिकेच्या सर्व यंत्रणांना कशा रितीनं समन्वयानं काम करता येईल यावरही या बैठकीत चर्चा झाली. विविध यंत्रणांनी आत्तापर्यंत केलेल्या उपाययोजना, पुढचं नियोजन, तसंच परस्पर समन्वयामध्ये आलेल्या अडचणीविषयीची माहिती या बैठकीत दिली गेली.
