SHIVSENA TIGER
मेट्रो स्टेशनला शिवसेना भवन नाव देण्याची शिवसैनिकांची मागणी
सध्या मुंबईमध्ये मुंबई मेट्रो ३ प्रकल्पाचं काम वेगाने सुरु आल्याचे दिसत आहे. ही मेट्रो तयार होण्यापूर्वीच मेट्रो स्टेशनच्या नावासाठी राजकीय पक्षांमध्ये जोरदार वाद निर्माण झालाय.
शिवसेना भवन जवळच्या मेट्रो स्टेशनला ‘दादर’ हे नाव न देता त्या स्टेशनला ‘शिवसेना भवन’ असे नाव देण्याची मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलीय. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी निवेदन पत्र देखील दिले आहे.
त्याचप्रमाणे मुंबई मेट्रो ३ प्रकल्पातील इतर स्टेशनला सायन म्युझियम, सिद्धिविनायक आणि शितला देवी अशी नावे देण्यात यावी अशी देखील मागणी त्यांनी केली आहे. त्याच वेळी भीम आर्मीने दादर किंवा शिवसेना भवन हि नावं न देता या मेट्रो स्टेशनला ‘चैत्यभूमी’ हे नाव देण्यात यावे अशी मागणी केली आहे.
