मुंबईच्या महापौरांनी जगातल्या ‘या’ ६ शहरांच्या महापौरांकडे केली कोविड प्रतिबंधक लसींचा पुरवठा करण्याची मागणी
मुंबई, दि.२९: जगातल्या सहा सिस्टर सिटीजने मुंबईला कोविड१९ प्रतिबंधक लसींचा पुरवठा करावा, असं आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. यासंदर्भात महापौरांनी सेंट पिटर्सबर्ग, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, बुसान, स्टूटगार्ड आणि योकोहोमा जगभरातल्या सिस्टर सिटीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरांच्या महापौरांना पत्रही पाठवली आहेत.
या सर्व शहरांनी कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवलं आहे. तशाच प्रकारे मुंबईच्या प्रयत्नातही या शहरांनी लस पुरवठा करून मदतीचा हातभार लावावा, असं महापौरांनी पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.
