राज्य सरकारTचे मुंबई उच्च न्यायालयाला आश्वासन
मुंबई, दि.२२: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी अर्थात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवरची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने येत्या २ जुलैपर्यंत स्थगित केली आहे.
परमबीर सिंग यांनी त्यांच्या विरोधात सुरु असलेल्या चौकशीलाही या याचिकेद्वारे आव्हान दिलं आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली.: या प्रकरणात महाराष्ट्र सरकार परमबीर सिंग यांच्याविरोधात येत्या ३ जुलैपर्यंत अटकेसह कोणतीही सक्तीची कारवाई करणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारने आपल्या वकीलांमार्फत न्यायालयाला दिली.
बेकायदेशीर फोन टॅपिंग मुंबई पोलिसांनी भारतीय पोलीस सेवेतल्या वरीष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी, रश्मी शुक्ला यांनी दाखल केलेल्या याचिकेवरची सुनावणीही न्यायालयानं २ जुलैपर्यंत स्थगित केली आहे. या प्रकरणातही शुक्ला यांच्याविरोधात येत्या ३ जुलैपर्यंत अटकेसह कोणतीही सक्तीची कारवाई करणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारनं न्यायालयाला दिली आहे.
Source – AIR
