मुंबई-गोवा महामार्गावर धमाणदेवी जवळ दरड कोसळून वाहतुक ठप्प
महाड/पोलादपूर: सततच्या पडणाऱ्या पावसामुळे मुंबई गोवा हायवे रोडवर धामणदेवी, पोलादपूर येथे दरड कोसळली आहे. दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली असून दरड काढण्याची कारवाई सुरू आहे. तरी, सदर मार्गे प्रवास करणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन रायगड पोलिसांनी केले आहे. या मार्गावर अतिवृष्टी झाल्यावर दरड कोसळणे ही दर पावसाळ्यात नेमाने घडणारी बाब आहे. सध्या चालू असलेल्या रस्ते रुंदीकरणामुळे रस्ता मोकळा करण्याच्या कामात कमी अडचणी येत आहेत.
