मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांकडून आतापर्यंत ७७ कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल
मुंबई, दि.२७: मुंबईत मास्क न घालणाऱ्यांकडून आतापर्यंत ७७ कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. ३७ लाख २३ हजारांहून अधिक नागरिकांवर ही कारवाई करण्यात आली. रेल्वे प्रशासन, पालिका, क्लिनअप मार्शल तसंच पोलीसांनी ही कारवाई केली. परंतू, या कारवाई दरम्यान क्लीनअप मार्शल्स च्या कार्यशैलीवर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्हही उपस्थित केले गेले. याच सोबत या सार्यात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात आला होता.
