Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

चिंताजनक: मुंबईत कोरोना बधितांचा आकडा २१८ ने वाढला, एकूण पॉसिटीव्ह रुग्ण झाले ९९३

चिंताजनक: मुंबईत कोरोना बधितांचा आकडा २१८ ने वाढला, एकूण पॉसिटीव्ह रुग्ण झाले ९९३

मुंबई: मुंबईत कोरोना बाधितांचा आणि मृतांचा आकडा हा वाढताच दिसतोय. मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारी नुसार नव्या आज नव्या २१८ रुग्णांची भर पडली आहे तर एकूण १० रुग्ण आज मृत पावले. आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांचा आकडा हा ९९३ वर पोहोचला असून एकूण ६४ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. याच जोडीला आज ४ रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. मुंबईतील बऱ्या होऊन घरी गेलेल्या एकूण रुग्णांचा आकडा ६९ वर गेला आहे.

मुंबई महापालिका पूर्ण कार्यक्षमतेने काम करतेय याचं मोठं उदाहरण म्हणजे आज मुंबईतल्या एकूण २८,२४३ ठिकाणी ज्यात सरकारांनी/खाजगी कार्यालये, गृहनिर्माण संस्था यांचा समावेश आहे अशा ठिकाणी निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात आली होती.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *