नोकऱ्यांच्या प्रश्नावर मुंबईत आझाद मैदानावर मराठा तरुणांचं आंदोलन, खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली भेट
मुंबई: नोकऱ्यांच्या प्रश्नावर गेल्या सात दिवसापासून मुंबईत आझाद मैदानावर मराठा तरुणांचं आंदोलन सुरू असून आज सकाळी या आंदोलकांची, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली.
राज्य सरकार, याचिका कर्त्यांचे वकील आणि नगरविकास खात्याचे सचिव यांच्यात आज संध्याकाळी साडेचार वाजता या बाबत संयुक्त बैठक होणार असून राज्य सरकार या प्रश्नावर तोडगा काढेल असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.