आठ जम्बो कोविड केंद्रं टप्पेनिहाय बंद करण्याचा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा निर्णय
कमी होणारी कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनानं आठ जम्बो कोविड केंद्रं टप्पेनिहाय बंद करण्याचा निर्णय घेतला. यानुसार पहिल्या टप्प्यात अशी ३ केंद्र बंद केली असून दुसर्या टप्प्यात आणखी ५ केंद्रं बंद करण्याचं ठरवलं आहे. मात्र सेव्हन हिल्स रुग्णालयासह महानगरपालिकेची ४ प्रमुख रुग्णालयं, १६ उपनगरीय रुग्णालयं आणि कस्तुरबा रुग्णालय या ठिकाणी नवीन कोरोनाबाधित रुग्णांवर योग्य ते औषधोपचार करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त शासनाच्या अखत्यारितील रुग्णालयं, खासगी रुग्णालयं या ठिकाणी देखील उपचार सुविधा उपलब्ध आहे.
Source – AIR
