मराठवाडा मुक्ती संग्राम आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याविषयी छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ गार्डन येथे दूर्मिळ छायाचित्र प्रदर्शन
छत्रपती संभाजीनगर, दि. १४; भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे केन्द्रीय संचार ब्यूरो, छत्रपती संभाजीनगर व महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सिद्धार्थ गार्डन, छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त “मराठवाडा मुक्ती संग्राम आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याविषयी” दुर्मिळ अशा छायाचित्र मल्टिमिडीया छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे चित्रप्रदर्शन दिनांक १५ ते १७ सप्टेंबर २०२४ (रविवार ते मंगळवार) या कालावधीत सकाळी १०.००ते सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी मोफत खुले राहणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम व भारतीय स्वातंत्र्य लढ्याची माहिती संक्षिप्त स्वरुपात व्हावी या उद्देशाने ह्या जनजागृतीपर चित्रप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी देशभक्तीवर अधारीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या चित्रप्रदर्शनीचे उद्घाटन दिनांक १५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १०.००वाजता होणार आहे. याप्रसंगी खासदार, भागवत कराड, खासदार संदीपान भुमरे पाटील, महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री, अतुल सावे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी अणि महानगरपालिका आयुक्त, जी श्रीकांत, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, प्रसिद्धी अधिकारी माधव जायभाये, सहायक प्रसिद्धी अधिकारी प्रदीप पवार तसेच शासनाचे विधीत अधिकारी व पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहाणार आहेत.
तरी या चित्रप्रदर्शनीला मोठ्या संख्येने भेट देऊन मराठवाडा मुक्ती संग्रामाची माहिती जाणुन घ्यावी असे आवाहन केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रलायाचे केन्द्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय-छत्रपती संभाजीनगर व महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर तर्फे करण्यात आले आहे.
