मॉन्सून ची वाटचाल रेंगाळली; अजून ५ दिवस तरी अशीच परिस्थिती राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज
मुंबई, दि.३०: मान्सूनची वायव्य भारतातली थांबलेली वाटचाल अजून ५ दिवस तरी पुन्हा सुरू होणार नाही असा हवामान विभागाचा आजचा अंदाज आहे.
राज्यातही या काळात मान्सून फारसा सक्रीय राहणार नाही मात्र पाऊस आहे. काल अपेक्षेप्रमाणे कोकणात सर्वत्र तर राज्याच्या इतर भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आजही असेच पाऊसमान अपेक्षित आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनांसह वादळी पावसाची सरही हजेरी लावू शकतो.
