पावसाचा जोर मंदावला; उत्तरेतील राज्यांना मान्सूनसाठी करावी लागणार प्रतिक्षा
मुंबई, दि.२३ मान्सूनची वायव्येकडील वाटचाल अजूनही थांबलेली आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड आणि दिल्ली या राज्यांना मान्सूनची आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. सध्यातरी देशभरातील पावसाचा जोर कमी झाला आहे.
राज्यात काल कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मऱाठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. मुंबई आणि परिसरातही मागील ३-४ दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. आजही राज्यातील पाऊसमान असेच राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
