येत्या १९ तारखेपर्यंत नैर्ॠत्य मान्सून भारताचा निरोप घेणार
सरासरी वेळापत्रकानुसार काल नैर्ॠत्य मान्सूननं संपूर्ण देशाचा निरोप घेणं अपेक्षित होतं मात्र अजूनही गोवा, कर्नाटक आणि केरळच्या काही भागात त्याचं अस्तित्व कायम आहे.
येत्या १९ तारखेपर्यंत हा नैर्ॠत्य मान्सून भारताचा निरोप घेईल आणि दक्षिणेत हिवाळी पाऊस घेऊन येणारा ईशान्य मान्सून २० ऑक्टोबरपासून सुरू होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
हवामानातल्या या बदलामुळे सध्या मध्य आणि उत्तर भारतात दिवसाच्या तापमानात वाढ होत असली; तरी लवकरच किमान तापमानात घट सुरू होऊन थंडीची चाहूल लागेल अशी अपेक्षा आहे.
मान्सूननं राज्याचा निरोप परवाच घेतला असला तरी ओडीशाच्या किनाऱ्याकडून आलेल्या वाऱ्यांमुळे विदर्भात आणखी तीन दिवस तरी अनेक ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे.याबरोबरच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो.
