अखेर मॉन्सून अंदमानात दाखल
नैऋत्य मोसमी पाऊस अंदमान समुद्री क्षेत्रात दाखल झाला आहे. गेल्या आठवड्यात हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार अंदमानात १५ मे रोजी नैऋत्य मोसमी पाऊस दाखल होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. केरळमध्ये २७ मे रोजी मान्सूनचं आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान, भंडारा जिल्ह्यात काल रात्री चा सुमारास अवकाळी पाऊस बरसला असून सर्वाधीक पावसाची नोंद तुमसर तालुक्यात ११ मिलिमीटर इतकी नोंद करण्यात आली असून, या अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकाला नुकसान झाले आहे
