अखेर अंदमान बेटांवर मॉन्सूनचे झाले आगमन
अंदमान: नैऋत्य मोसमी पाऊस अंदमान बेटांवर काल दाखल झाला. दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटं आणि अंदमान सागरापर्यंतचा परिसर मोसमी पावसानं व्यापला आहे.
२१ मे रोजी मोसमी पाऊस या भागात पोहोचण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता, त्यामुळे आता ३१ मे रोजी मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होणार असल्याचं, हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.
