टाटा मॉन्सून! उद्या घेणार महाराष्ट्राचा निरोप – हवामान खात्याचा अंदाज
मुंबई: राजधानी नवी दिल्लीत आज धुकं राहिल तर मुंबई आणि कोलकत्यात काही अंशी ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.
चेन्नईत हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जम्मू काश्मीरमध्ये हवामान कोरडं राहण्याचा अंदाज असला तरी लडाखमधील लेह इथं वातावरण अंशत: ढगाळ राहील.
उर्वरित उत्तर भारतात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असली तरी उद्या मान्सून राज्याचा निरोप घेईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
