Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘हे’ आहेत मोदींचे महाराष्ट्रातील शिलेदार, पण सुरेश प्रभू गायब

‘हे’ आहेत मोदींचे महाराष्ट्रातील शिलेदार, पण सुरेश प्रभू गायब

नरेंद मोदी व त्यांच्या नव्या टीमचा काल शपथविधी झाला. आज या सर्व मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले. महाराष्ट्रातून जवळपास ६ जणांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागली आहे. पण या सर्वात कमी आहे ती सुरेश प्रभु यांची. मोदी – १ सरकार मध्ये रेल्वे नंतर वाणिज्य खातं सांभाळल्यानंतर मोदी – २ सरकारमध्ये त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते असे संकेत होते पण काल केंद्रीय मंत्री म्हणून त्यांची निवड न झाल्यामुळे या बाबत चर्चेला विराम मिळाला.

हे आहेत महाराष्ट्रातले शिलेदार

१) नितीन गडकरी – भूपृष्ठ वाहतूक, महामार्ग, सुक्ष, लघु आणि मध्यम उद्योग (कॅबिनेट मंत्री)

२) प्रकाश जावडेकर : पर्यावरण आणि वने, माहिती आणि प्रसारण (कॅबिनेट मंत्री)

३) अरविंद सावंत : अवजड उद्योग (कॅबिनेट मंत्री)

४) पियुष गोयल : रेल्वे, वाणिज्य उद्योग (कॅबिनेट मंत्री)

५) रावसाहेब दानवे : ग्राहक संरक्षण आणि अन्न पुरवठा (राज्यमंत्री)

६) रामदास आठवले : सामाजिक न्याय (राज्यमंत्री)

७) संजय धोत्रे : मनुष्यबळ विकास, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान (राज्यमंत्री)

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *