पाणीप्रश्नी मुख्यमंत्र्यांचे गुजरातला झुकते माप : मनसे
मुंबई: महाराष्ट्र दुष्काळाचा सामना करत असताना, राज्याच्या हक्काचं पाणी गुजरातला दिलं जात असल्याचा गंभीर आरोप मनसेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज केला आहे.
राज्यातल्या १३ जिल्ह्यात दुष्काळ असताना महाराष्ट्राच्या हक्काचं ४६ टीएमसी पाणी गुजरातला वळवल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व माजी आमदार नितीन भोसले यांनी केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात पाणी देण्याचा असा कोणताच करार झालेला नसताना मुख्यमंत्र्यांनी भाषणात खोटी माहिती देत लोकांची दिशाभूल केल्याचेही ते पुढे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा या जोडीला खुश करण्यासाठी गुजरातला जाणारं पाणी मुख्यमंत्री अडवत नसल्याचेही ते म्हणाले.
