Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

कामोठे येथे भाजप नगरसेवकाचा मनसे कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

कामोठे येथे भाजप नगरसेवकाचा मनसे कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

कामोठे : नवी मुंबईतील कामोठे सेक्टर ७ येथील परिसरात पनवेल महानगर पालिकेतील भाजप नगरसेवक विजय चिपळेकर यांनी काल २९ एप्रिल रोजी रात्री १२ च्या सुमारास मनसेचे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. आठ ते दहा कार्यकर्त्यांसोबत स्वतः नगरसेवक विजय चिपळेकर यांनी प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला केला. हि सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

या हल्यात प्रशांत जाधव गंभीर जखमी झाले असून विजय चिपळेकर आणि त्यांचे साथीदार फरार झाले. सोसायटी मधील अंतर्गत वादातून नगरसेवक विजय चिपळेकर यांनी प्रशांत जाधववर जीवघेणा हल्ला केल्याचे सांगितले जाते. जाधव यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

कामोठे पोलीस स्टेशनमध्ये भाजप नगरसेवक प्रशांत जाधव यांच्यसह ८ ते ९ जणांवर गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास सोनवणे यांनी दिली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *