मनसे तर्फे दहिसर मधील शाळांना ‘मराठी भाषा दिन’ साजरा करण्याबाबत निवेदन
मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस म्हणून दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन साजरा केला जातो.
जसजशा इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे प्रमाण वाढत आहे, तसतसे मराठी भाषा बोली स्वरूपात तसेच लिखित स्वरूपात वापरण्याचे प्रमाण विद्यार्थ्यांकडून हळू-हळू कमी होत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने दहिसर विधानसभेतील सर्व शाळांना २७ फेब्रुवारी २०१९ रोजी “मराठी भाषा दिवस” प्रत्येक शाळेत साजरा झालाच पाहिजे ह्याबद्दल निवेदन देण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांना आपल्या मराठी भाषेबद्दल माहिती देऊन त्यांच्यामध्ये मराठी भाषेबद्दल रुची निर्माण करावी, मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे याबद्दल विनंती करण्यात आली.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष श्री राजेश येरूणकर तसेच विभाग अध्यक्ष कुणाल मेस्त्री यांच्या मार्गदशनखाली दहिसरमधील सर्व शाळांमध्ये निवेदन देण्यात आले.
यावेळी मनविसे विभाग सचिव किरण गायकवाड, विद्यार्थीनी विभाग सचिव प्रियंका थोरात, उपविभाग अध्यक्ष अमोद कदम, अक्षय जाधव उपस्थित होते.

