हा पहा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नव्या रुपातला नवा झेंडा
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राज्यस्तरीय महाअधिवेश सध्या गोरेगाव येथील नेस्को एक्सहिबिशन सेंटर येथे चालू असून यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण करण्यात आलं. गेले अनेक दिवस याबाबतच्या बातम्या येत होत्या. या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे व बाकी संपूर्ण झेंडा भगव्या रंगात आहे. यावरून येत्या काळात थोडा गदारोळ होण्याची चिन्ह आहेत कारण अनेक शिवप्रेमींनी नव्या झेंड्याचे वृत्त जेव्हा आलं तेव्हा विरोध दर्शवला होता.
