मनसेची २७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बाळा नांदगावकरांच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स
मुंबई: काँग्रेस, शिवसेना, भाजप पाठोपाठ मनसेनेही विधानसभा निवडणुकांसाठी २७ उमेदवारांची पहिली यादि आज जाहीर केली आहे. या यादीत मनसेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले बाळा नांदगावकर यांना तिकीट देण्यात आलेले नाही. माहीम विधानसभा मतदारसंघातून संदीप देशपांडे, ठाण्यातून अविनाश जाधव, बेलापूर मधून गजानन काळे या मनसेच्या प्रमुख नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही विधानसभा निवडणुक मनसे लढणार की नाही याबाबत सुरुवातीला सुस्पेन्स होता. पण २ दिवसांपूर्वी मनसेने यावरून पडदा उघडला.
मनसेच्या २७ उमेदवारांची पहिली यादी
1. कल्याण ग्रामीण – प्रमोद (राजू) रतन पाटील
2. कल्याण पश्चिम – प्रकाश भोईर
3. नाशिक पूर्व – अशोक मुर्तडक
4. माहिम – संदीप देशपांडे
5. हडपसर – वसंत मोरे
6. कोथरूड – किशोर शिंदे
7. नाशिक मध्य – नितीन भोसले
8. नाशिक पश्चिम – दिलीप दातीर
9. वणी – राजू उंबरकर
10. ठाणे – अविनाश जाधव
11. मागाठाणे – नयन कदम
12. कसबा पेठ – अजय शिंदे
13. सिंदखेडा – नरेंद्र धर्मा पाटील
14. इगतपुरी – योगेश शेवरे
15. चेंबूर – कर्णबाळा दुनबळे
16. कलिना – संजय तुर्डे
17. शिवाजीनगर – सुहास निम्हण
18. बेलापूर – गजानन काळे
19. हिंगणघाट – अतुन वंदिले
20. तुळजापूर – प्रशांत नवगिरे
21. दहिसर – राजेश येरुणकर
22. दिंडोशी – अरुण सुर्वे
23. कांदिवली पूर्व – हेमंत कांबळे
24. गोरेगाव – विरेंद्र जाधव
25. वर्सोवा – संदेश देसाई
26. घाटकोपर पश्चिम – गणेश चुक्कल
27. वांद्रे पूर्व – अखिल चित्रे
