‘पर्लवाईन इंटरनॅशनल’: आणखी एक घोटाळेबाज ‘एमएलएम’ कंपनीचा टीम महाराष्ट्र वार्ता कडून पर्दाफाश; ‘ईडी’ कडे केली तक्रार
मुंबई: दोन महिन्यापूर्वीच नवी मुंबईतील वाशी स्थानकाजवळील रिअल टेक पार्क मध्ये चालवल्या जाणाऱ्या एका ‘एमएलएम’ (कॅपिटल ट्रेड) स्कीम चा पर्दाफाश नवी मुंबई पोलिसांनी आयुक्त संजय कुमार यांच्या नेतृत्वाखाली केला. या व अशा प्रकारच्या कमी वेळात आणि कमी कष्टात जास्त नफा दाखवणाऱ्या फसव्या योजनांबाबत माध्यमांमध्ये नित्य तक्रारी येत असताना सुद्धा माणसं अशा कंपन्यांच्या नादी लागून स्वतःच्या कष्टाच्या कामाईची राख करतात. अशाच प्रकारची कमी वेळात जास्त उत्पन्नाचं आमिष दाखवणारी एक ऑनलाईन घोटाळेबाज कंपनीचा आम्ही आमच्या विशेष “ऑपरेशन ब्लॅक मार्ट” मोहिमेद्वारे आज पर्दाफाश करत आहोत.
“पर्लवाईन इंटरनॅशनल” (PEARLVINE) ही एक अशीच ऑनलाईन घोटाळेबाज कंपनी आहे जीचं मुख्यालय अमेरिका स्थित असल्याचे त्यांच्या संकेतस्थळावर नमूद केले आहे. कमी वेळात जास्त पैसे कमावण्याच्या नादात या कंपनीत मुख्यत्वे मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पुणे व उर्वरित महाराष्ट्रातील मोठ्या जिल्ह्यांतील जवळपास हजरो लोकांनी पैसे लावल्याचे आम्हाला जाणवले. किंबहुना हे नेटवर्क भारतभर पासरल्याचेच दिसते. याबाबत आमच्या विशेष टीम ने अभ्यास केला तेव्हा कळले की यात २१०० रुपये अथवा ३० $ डॉलर इतकी रक्कम गुंतवावी लागते. यानंतर तुम्हाला चार सदस्य तुमच्याखाली ऍड करावे लागतात. त्यानंतर तुम्हाला खाली वाढत जाणाऱ्या सदस्यानुसार दर माणशी १ डॉलर म्हणजेच ७२ रुपये मिळायल्या सुरुवात होते. अशाच प्रकारे त्यांच्या बऱ्याच स्कीम्स आहेत त्यात करोडो रुपयांचं उत्पन्न दाखवण्यात आलं आहे. या स्कीम चं वैशिष्ट्य म्हणजे या सायबर युगात तुम्हाला तुमच्या मोबाईल अथवा कॉम्प्युटर वर इंटरनेट च्या माध्यमातून एका क्लीक सरशी सारे व्यवहार उरकता येतात. पण या अशा कंपन्या एका झटक्यात बंद होतात आणि आपले पैसे डोळ्यांसमोरून अचानक नाहीसे होतात.
या साऱ्याचा अभ्यास केल्यावर आम्हाला प्रश्न हा पडला की कोणतीही वस्तू न विकता लोकांना उत्पन्न कोणत्या आधारे दिलं जातंय? एम.एल.एम.(मल्टि लेव्हल मार्केटिंग), चिट फंडस च्या माध्यमातून लोकांकडून पैसे घेण्यास सरकारची बंदी असतानाही ही मंडळी थेट परदेशतुन हे पैसे कसे काय देशाबाहेर नेऊ शकतात. नक्कीच यात स्थानिक कनेक्शन असणार. याबाबत सरकारी यंत्रणेने घोटाळा उघड झाल्या नंतर लक्ष टाकण्यापेक्षा आधीच लक्ष घालून त्यावर बंदी घालणे तसेच यांच्या भारतातील हस्तकांना गजाआड करणे अपेक्षित असताना प्रशासन नेमकं कशाची वाट पहातंय. या प्रकरणी आम्ही सक्तवसुली संचालनालयाकडे(ED) दि. १८ फेब्रुवारी रोजी लेखी तक्रार दाखल केली आहे.
ईडी ला लिहिलेले तक्रार पत्र

या प्रकरणी महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस, नवी मुंबई पोलीस, रायगड पोलीस यांनीही रीतसर लक्ष घालणे गरजेचे आहे. जर तुम्हालाही कोणी अशा प्रकारच्या एमएलएम MLM स्कीम, पैसे एवढ्या दिवसात दुप्पट करण्याच्या स्कीम गळ्यात मारत असतील, अथवा असे जर आपल्या निदर्शनास आले तर आपण आम्हाला याबाबतची माहिती ८८५०३०३४६३(नवीन क्रमांक) या क्रमांकावर व्हाट्सअप्प द्वारे पाठवू शकता. (आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल)
