Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘जीटीआय’ अंतर्गत कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी मिलिंद पाटील

‘जीटीआय’ अंतर्गत कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी मिलिंद पाटील

उरण, दि.१०(विठ्ठल ममताबादे): जीटीआय अंतर्गत कामगार संघटनेच्या निवडणुकीत कामगारांनी पुन्हा एकदा चालू कार्यकारणीला निवडून दिले आहे. जीटीआय अंतर्गत कामगार संघटनेची निवडणूक १ नोव्हेंबर २०२१ रोजी झाली असून या निवडणुकीत कामगारांनी पुन्हा एकदा चालू कार्यकारणी वर विश्वास टाकत चालू कार्यकारणीला निवडून दिले आहे. संघटनेच्या अध्यक्षपदी –  मिलिंद रमाकांत पाटील (बोकडवीरा ), जनरल सेक्रेटरी – आशिष अशोक कडू (सोनारी ), उपाध्यक्ष – राजाराम वामन म्हात्रे (जासई ), खजिनदार – समीर म्हात्रे (गव्हाण ), सहसेक्रेटरी – संजय मदन केणी (चिंचपाडा ) यांची निवड या निवडणुकीत झाली आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व कामगारांनी अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *